वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन विधिमंडळात वादंग, नारायण राणे म्हणाले, 'या मैदानात' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2016

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन विधिमंडळात वादंग, नारायण राणे म्हणाले, 'या मैदानात'

मुंबई - वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारीविरुद्ध विरोधक असे चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाला मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अखंड महाराष्ट्राचे समर्थन करत चांगलेच धारेवर धरले आहे...मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भाच्या मानसिकतेचे असून असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. इतकेच नव्हे तर मैदानात या, अशा शब्दात राणे यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

अखंड महाराष्ट्रावर चर्चेसाठी नियम 289 अनव्ये विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला. अखंड महाराष्ट्राचे बॅनर परिधान करून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. तर शिवसेना आमदारांनी भगवी टोपी घालून वेगळ्या विदर्भला विरोध दर्शवला. विरोधकांचे वर्तन पाहून संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला. शिवसेनेसह विरोधकांचे वर्तन असंसदीय असल्याचे बापट यांनी म्हटले आहे.अखंड महाराष्‍ट्राच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सबंध मंत्रिमंडळ बरखास्त करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच यामुद्द्यावर काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्‍यात आले.


जनतेच्या जीवाशी का खेळताय? राणेंचा सवालअखंड महाराष्ट्रासाठी106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. देशातील जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. ते महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी नाही. राज्यातील जनतेच्या जीवाशी का खेळताय? आधी राजीनामा द्या व मैदानात या, अशा शब्दात नारायण राणे यांनी भाजप सरकारला आव्हान दिले.


राणे म्हणाले की, स्वतःच इमारत बांधायची आणि नंतर तिला खालून सुरुंग लावावा, असा प्रकार फडणवीस सरकार करत आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा आम्ही ऐकून घेणार नाही.उचलला राजदंड
शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट वेलमध्ये उतरुन राजदंड उचलला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी राजदंड पुन्हा जागेवर ठेऊन दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad