चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा - अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा - अजित पवार

कोकणातील ३६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
मुंबई, दि. ३ - महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद आज विधानसभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवत याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा (३०२) गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. या दुर्घटनेला सरकारचा बेजबाबदरपणा कारणीभूत असून, नवीन पुलावरुन वाहतूक सुरु असताना जुन्या पुलावरुन वाहतूक बंद का केली नाही ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. तसेच या घटनेची न्यायायलयीन चौकशी करून कठोर कारवाई करा अशीही मागणी केली.

पाऊस नव्हता तेव्हा पाण्यासाठी हाल आणि आता पाणी आहे तर कुठले नियोजन नाही. सर्व आघाडयांवर सरकार अपयशी ठरत असून सरकारकडे कुठलेही नियोजन नाही असा आरोप अजित पवार यांनी केला. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला असतानाही कोणतीही खबरदारी का घेतली नाही, वाहतूक का थांबवली नाही असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. 
या आरोपांना सरकारच्यावतीने उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंधरा मिनिटात प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असा दावा केला. एनडीआरएफच्या चार टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या असून, तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्य सुरु असल्याचे सभागृहाला सांगितले. 

कोकणातील ३६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ३६  पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोकणातील ३६ पुलांचे ऑडिट करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना शिंदे यांनी पीडब्ल्यूडी सचिव (रस्ते) सी. पी. जोशी यांना दिली आहे. पुढील महिन्यांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी जातील. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच दुर्घटना होऊ नये, यासाठी तातडीने या पुलांचे, विशेषत: ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad