अहमदाबाद 16 Aug 2016 - गुजरातमध्ये दलितांवर हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार उनामधील रॅली आटोपून घरी परतणा-या दलितांच्या एका गटावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून काही गाडया जाळण्यात आल्या. उना-भावनहर महामार्गावर सेमतार गावाजवळ सोमवारी ही घटना घडली.
सेमतार हे तेच गाव आहे ज्या गावातून दलित कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी तेरा जणांना अटक झाली होती. गृहराज्यमंत्री प्रदीपसीन जाडेजा यांनी कुठलाही हिंसाचार झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. हल्लेखोरांनी जय भीम अशी घोषणा दिली. आम्ही या घोषणेला प्रतिसाद देताच त्यांनी हल्ला केला. मी या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो पण माझा चुलत भाऊ अशोक मारहाणीमध्ये जखमी झाला असे मावजी सारविया यांनी सांगितले. आझादी कूच रॅलीसाठी ते अहमदाबाद येथे गेले होते. ही रॅली संपवून घराच्या दिशेने परतत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी माझी दुचाकी जाळली. एका क्वालिस गाडीचीही नासधूस केली असे मावजी यांनी सांगितले. पोलिस आम्हाला उनाला घेऊन आले पण त्यांनी एफआयआर नोंदवला नाही असे मावजी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment