लताबाई सकट महिला महामंडळ स्थापनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2016

लताबाई सकट महिला महामंडळ स्थापनेची मागणी

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील देवदासी, विधवा, परित्यक्ता, मुरळी, आराधी या निराधार महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, ही मागणी अद्यापि प्रलंबित असून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करून उपेक्षित महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या संस्थापक लताबाई सकट, अध्यक्ष विलासभाऊ रूपवते यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 



रूपवते यांनी दिलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या कार्यरत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ या महिलांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे देवदासी, विधवा, परित्यक्ता मुरळी, आराधी या महिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ लताबाई सकट यांच्या नावाने स्थापन करण्यात यावे. जेणेकरून निराधार महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांना रोजीरोटीसाठी वणवण भटकावे लागणार नाही. परित्यक्ता महिलांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्यावर शासनाने तत्काळ निर्णय द्यावा, अशी मागणीदेखील लताबाई सकट आणि विलास रूपवते यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad