इंदू मिलची जमीन राज्य शासनास हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2016

इंदू मिलची जमीन राज्य शासनास हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०१६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची 12 एकर जमीन महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नियम आणि अटींच्या अधिन राहून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आपल्या मालकीची इंदू मिलची 12 एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करेल.
मुंबईतील चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणस्थळाशेजारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची इंदू मिलची जागा आहे. याठिकाणी डॉ.आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. महाराष्ट्र शासनाने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा यशस्वी पाठपुरावा केला आणि केंद्राने त्यास मान्यता दिली. वस्त्रोद्योग सुधारणा कायदा १९९५ च्या ‘कलम ११अ’ अंतर्गत महाराष्ट्र शासन या जागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला अदा करेल, असा निर्णयही घेण्यात आला होता. यासंदर्भात भारत सरकार, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करारही झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad