मुंबई शहराचे जीवनवाहिनी असलेले तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱया प्रमुख सात तलावांपैकी विहार, मोडकसागर व तानसा हे तीन तलाव गत चोवीस तासात ओसंडून वाहू लागले असून मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग घडला आहे.
यामध्ये सर्वप्रथम विहार तलाव हा १ ऑगस्ट २०१६ ला पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी ओसंडून वाहू लागला.त्यानंतर मोडकसागर तलाव हा १ ऑगस्ट २०१६ च्या रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यानंतर २ ऑगस्ट २०१६ ला पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी तानसा तलाव हा ओसंडून वाहू लागला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चोवीस तासात तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण साडेचौदा लक्ष लिटर असून आजपर्यंत सातही तलावात अकरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे पंचेचाळीस लक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला आहे. उर्वरित तलावही लवकरच ओसंडून वाहू लागतील अशी आशा आहे. सध्यस्थितीत अप्पर वैतरणा आपल्या पूर्ण क्षमतेपेक्षा तीनमीटर,भातसा पाच मीटर तर मध्यवैतरणा हा साडेसहा मीटरने भरावयाचे बाकी आहेत.
No comments:
Post a Comment