मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2016

मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि.11 : महाराष्ट्र शासनाच्या एतदर्थ मंडळामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2016 मध्ये मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध नमुन्यातील अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांमार्फत भाषा संचालनालयाच्या नवी मुंबईपुणेनागपूर व औरंगाबाद विभागीय कार्यालयाकडे पाठवावेतअसे भाषा संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


मराठी टंकलेखन परीक्षेस इंग्रजी टंकलेखनाचे काम करणारे टंकलेखक व लिपिक-टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखक व लघुटंलेखक यांच्यासाठी मराठी टंकलेखन परीक्षा (30 शब्द प्रति मिनिट) गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016 घेण्यात येणार आहे. तसेच मराठी लघुलेखन परीक्षेस इंग्रजी टंकलेखक (निवडश्रेणीउच्चश्रेणीनिम्नश्रेणी) व लघु-टंकलेखक यांच्यासाठी मराठी लघुलेखन परीक्षा (80 शब्द प्रति मिनिट) मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणकावर घेण्यात येणार असून यासाठी आय.एस.एम सॉफ्टवेअरमध्ये DVOT-Surekh MR हा फाँट टंकलेखनासाठी वापरण्यात येणार आहे. या मराठी टंकलेखन परीक्षेकरिता 31 ऑगस्ट 2016 व मराठी लघुलेखन परीक्षेकरिता 7 सप्टेंबर 2016 पर्यंत विविध नमुन्यातील अर्ज कार्यालयीन प्रमुखांमार्फत पाठवावेत, असे पत्रकात नमूद आहे. 

विविध नमुन्यातील अर्ज कार्यालयीन प्रमुखांमार्फत पुढील विभागीय कार्यालयाच्या पत्त्यांवर पाठवावेत. 1) मुंबई व कोकण विभाग- विभागीय सहायक भाषा संचालकभाषा संचालनालयविभागीय कार्यालयकोकण भवन, 3 रा मजलानवी मुंबई, 400614, दूरध्वनी क्र. 022-227573542. 2)पुणे व नाशिक विभाग - विभागीय सहायक भाषा संचालकभाषा संचालनालयविभागीय कार्यालय नवीन मध्यवर्ती इमारत रा मजलापुणे-411001,दूरध्वनी क्र. 020-26121709. 3) नागपूर व अमरावती विभाग- विभागीय सहायक भाषा संचालकभाषा संचालनालयविभागीय कार्यालयप्रशासकीय इमारत, 2 रा मजलासिव्हिल लाईन्सनागपूर- 440001. 4) औरंगाबाद विभाग- विभागीय सहायक भाषा संचालकभाषा संचालनालयविभागीय कार्यालयऔरंगाबाद विभागजुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसरऔरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र.0240-2361372.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad