मुत्रपिंड प्रत्यारोपण पारदर्शी होण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2016

मुत्रपिंड प्रत्यारोपण पारदर्शी होण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती

मूत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करणार - डॉ. दीपक सावंत
मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2016 : 
मुत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला असून ही समिती यासंदर्भात १५ दिवसांत कार्यपद्धती (SOP) तयार करेल. मुत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करून ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युरोलॉजीस्ट आणि नेफ्रॉलजीस्ट संघटनांच्या सदस्यांनी भेट घेऊन व्यथा मांडली होती. त्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मूत्रपिंड प्रत्योरोपण अधिक सुलभ  होण्यासाठी नियमावली (SOP)करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय, न्युरोलॉजीस्ट, नेफ्रॉलॉजीस्ट आदी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती येत्या आठवडाभरात गठीत करून पंधरा दिवसात नियमावली तयार करण्यात येईल.
मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि एकुणच अवयदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होण्यासाठी आरोग्य विभागातर्फे रुग्णांमध्ये आणि अवयव दात्यांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न  केले जात आहे.
ज्या रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथे एक विशेष कक्ष तयार करून मुत्रपिंड दाता आणि ते स्विकारणाऱ्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना मुत्रपिंड शस्त्रक्रियेची माहिती, परिणामाविषयी ध्वनीचित्रफित दाखविण्यात येईल. तसेच किडनी दाता आणि स्विकारणारा रुग्ण यांच्याकडून संमतीपत्र देखील तयार करून घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया या विशेष कक्षात `इन कॅमेरा` होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मूत्रपिंड दात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून त्यामाध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया ऑनलाईन करून त्याद्वारे मूत्रपिंड दात्याची माहीती, मुत्रपिंड स्विकारण्याऱ्या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलीत होईल व ती माहीती ऑनलाईन करण्यात येईल, याप्रक्रियेच्या माध्यमातून मुत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. संबंधित रुग्णालयांकडून शस्त्रक्रियोत्तर माहिती घेऊन मुत्रपिंड दात्याची शस्त्रक्रियेनंतर तपासणी करून खात्री करण्यात येईल.
ज्या रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथील डॉक्टरांसाठी सातत्याने कार्यशाळा आयोजित करून प्रत्यारोपण कायदा त्यातील बदल आदीबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच याकामी मदत करणाऱ्या समन्वयकांचे देखील प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ७५ रुग्णालयांना परवाने देण्यात आले असून यकृत प्रत्योरपणासाठी २१, हृदय प्रत्योरोपणासाठी ०७ आणि फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी ०५ रुग्णालयांना परवाने देण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad