पुणे दि. 18 Aug 2016 :
समाजातील विषमतेची विषवल्ली दूर करण्याचे काम करणाऱ्यांना शासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या सर्व समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तसेच या मान्यवरांना सन्मानाने वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचे आमंत्रणही त्यांनी दिले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राज्यातील 54 व्यक्तींना व 10संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेंव्हा मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्रीविजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते, खासदार संजय काकडे, खासदार अमर साबळे, आमदार ॲड. जयदेव गायकवाड, शरद रणपिसे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तपकीर, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या संकल्पनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसंविधानात्मक चौकट दिली असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच देशाची प्रगती सुरुअसून आजही देश एकसंध राहीला आहे. डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांचाविचार केला. प्रत्येक वंचिताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केले. लोकशाहीमुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे असेही ते म्हणाले.
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणाऱ्यांना शासनाने समाजभूषण पुरस्कार दिला आहे. राज्यात सामाजिक परिवर्तनाचे कामकरणाऱ्या प्रत्येकाच्या मागे शासन ठाम पणे उभे राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सर्वसमाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून या मान्यवरांना 1200 व्याधींसाठी राज्यातील 500 प्रतिथयश रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळतील. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे परिवर्तन होत आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावचे नेतृत्व होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीचाकार्यक्रम दिमाखात करण्यात आला. जगभरातील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली. अशा मोठ्या नेत्याचे स्मारक कोणत्याही वादाशिवाय होण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत याचवर्षी बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून शासन दलित समाजाचा विकास करत आहे. डॉ. बाबासाहेबांनी घालूनदिलेल्या सामाजिक समतेच्या वाटेवर आम्ही चालत आहे. मागासवर्गीय समाजासाठी शासनाकडून देण्यात आलेला सर्व निधी त्याच कामांवर खर्च करण्यावरआम्ही विशेष लक्ष देत असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची सर्व प्रक्रीया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment