मुंबई, दि. 11 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई शहर व जिल्हा कार्यालयामार्फत वितरण करण्यात आलेल्या कर्जाची रक्कम न मिळालेल्या अथवा या कर्ज वितरणाबाबत तक्रार असणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई शहर व जिल्हा कार्यालयामार्फत सन 2012-13 ते 2014-15 या आर्थिक वर्षांमध्ये विविध योजनेअंतर्गत कर्ज वितरण करण्यात आले आहे. अशा वितरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संक्षिप्त यादी कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्याप कर्जाची पूर्ण रक्कम मिळाली नाही अथवा कर्ज वितरणासंदर्भात तक्रार असलेल्यांनी कार्यालयीन वेळेत तपास अधिकारी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई, (दूरध्वनी क्रमांक 022-22672585 किंवा 27571485) येथे अथवा hccidcrimck6@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment