मुंबई, दि. 5 : राज्य शासनाने महाराष्ट्र केरोसिन डीलर्स लायसन्सिंग ऑर्डर 1966 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे समांतर केरोसिन बाजार व्यवस्थेअंतर्गत फ्री सेल केरोसिनचा पुरवठा करणे, वितरण आणि खरेदी व विक्री करणे नियंत्रण मुक्त करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे फ्री सेल विक्रीसाठी आता परवान्याची आवश्यकता लागणार नाही.
केंद्र शासनाने 19 जानेवारी 2015 च्या अधिसूचनेद्वारे केरोसिन आदेश 1993 मध्ये सुधारणा केल्या होत्या. यानुसार समांतर बाजार व्यवस्थे अंतर्गत फ्री सेल केरोसिनचा पुरवठा करणे, वितरण आणि खरेदी व विक्री करणे नियंत्रण मुक्त केल्या आहेत. राज्य शासनानेही दि. 4 ऑगस्ट 2016 च्या शासन अधिसूचनेद्वारे सुधारणा केल्या आहेत. यानुसार फ्री सेल केरोसिन घाऊक व फेर विक्रेते यांना फ्री सेल केरोसिन विक्रीसाठी परवानगी लागणार नाही, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment