मुंबई दि.2: परेल, शिवडी येथील ओमेगा इन्व्हेस्टमेंट कंपनीने अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरु केल्यासंदर्भात संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
या संदर्भातला प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. वायकर म्हणाले की, या संदर्भात लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिनांक 21 जानेवारी 2016 रोजीचे सादर केलेले निवेदन या विभागाकडे प्राप्त झालेले नाही. दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिनांक 2 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी 2016 रोजीच्या निवेदनाच्या प्रती नगरविकास विभागाकडून या विभागास नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत. सदरची निवेदने योग्य त्या कार्यवाहीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment