प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती समित्या गठित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2016

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती समित्या गठित

मुंबईदि. 10 : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर व अंधेरीबोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर गृह विभागाने आदेशित केल्यानुसार समित्या गठित करण्यात आल्या आहेत, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

26 जानेवारी15 ऑगस्ट1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रममहत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेलेमाती लागलेले मैदानातरस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसील कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad