मुंबईच्या डोंगरीतील ११ मजल्यांचा अनधिकृत टॉवर पाडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

मुंबईच्या डोंगरीतील ११ मजल्यांचा अनधिकृत टॉवर पाडणार

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी 'एमआरटीपी'त बदल
मुंबई, दि. ३ :- मुंबईच्या डोंगरी भागातील केशवजी नाईक रोडवरील इमारत क्रमांक अकराचं विनापरवाना अनधिकृत बांधकाम १५ दिवसात पाडण्यात येईल, तसंच शहरातील अन्य उपकरप्राप्त इमारतींची विनापरवाना दुरुस्ती किंवा पुनर्विकास करणाऱ्या व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर त्वरीत कडक कारवाई करण्यात येईल, त्यासाठी एमआरटीपी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केली.


धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, डोंगरी येथील तळमजला अधिक चार मजल्यांची इमारत पाडून त्याठिकाणी कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता अकरा मजल्यांचा टॉवर उभा करण्यात येत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. अशा प्रकारच्या विनापरवाना बांधकामांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त करुन संबंधीत इमारतीसह मुंबईतील अन्य उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना संबंधित बिल्डर, विकसकांकडून सर्व नियम डावलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगरी येथे कुठलीही परवानगी न घेता उभा राहत असलेला अनधिकृत टॉवर हा महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांच्या संरक्षणाशिवाय उभा राहू शकत नाही, त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या मागणीशी सहमती व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सदर टॉवरचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची तसेच शहरातील अन्य अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी एमआरटीपी कायद्यात आवश्यक बदल करण्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad