मुंबई, दि.2 : नवी मुंबईत सिडकोच्या मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करुन इमारती उभारल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी सिडकोच्या विशेष पथकामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
या संदर्भातला प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य संजय सावकारे, योगेश सागर यांनी प्रश्न विचारला होता.
फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईतील कौपरखैरणे नोड मध्ये सेक्टर 99अस्तित्वात नाही. तथापि, कोपरखैरणे येथील सेक्टर 11 आणि ऐरोली सेक्टर 9 ई येथील भूखंडाच्या वाटपाबाबत महामंडळाचे बनावट दस्ताऐवज तसेच त्रिपक्षीय करारनाम्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. सदर कागदपत्रांद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्व संबंधितांविरुध्द नवी मुंबईच्या सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश 26 जुलै 2016 रोजी सिडको महामंडळाला देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment