मुंबई, दि. 3 : राज्यातील जलसंधारणांच्या कार्यात उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘महात्मा ज्योतीबा फुले जलमित्रपुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असून पुरस्काराच्या नियम व अटीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. हे पुरस्कार पत्रकार, एनजीओ यांसह तालुकास्तर, जिल्हास्तरावर दिले जातील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
सदस्य नीलम गोऱ्हे, माणिकराव ठाकरे, हुस्नबानो खलिफे आणि इतर सदस्यांनी मविप नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावास उत्तरदेताना शिंदे बोलत होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, जलसंधारण कामातील ‘जलयुक्त शिवार योजना’ राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या दोन वर्षापासूनपडत असलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना विभागीय, जिल्हा, तालुका आणि पंचायत समितीस्तरावर राबविण्यात येत असून आतापर्यंत (दोनवर्षांत) या योजनेवर 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. जलयुक्त शिवार योजना जनतेमध्ये खूप लोकप्रियझाली आहे. त्यामुळे राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार ही योजना कोकणातही राबविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असून जलसंधारणाचे काम करणाऱ्या महिलांनाअहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्याचा विचार असल्याचेही प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment