वातानुकूलित मुंबई दर्शन सहल महाराष्ट्र पर्यटन सृष्टीतील एक महत्वाचे पाऊल - जयकुमार रावल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2016

वातानुकूलित मुंबई दर्शन सहल महाराष्ट्र पर्यटन सृष्टीतील एक महत्वाचे पाऊल - जयकुमार रावल

 मुंबई, दि. ८‍  :  बृहन्मुंबई विद्युत पुरवठा वाहतूक(बेस्ट) व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. ११ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या  वातानुकूलित मुंबई दर्शन सहल बसचा शुभारंभ म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटन सृष्टीतील एक  महत्वाचे पाऊल आहेअसे प्रतिपादन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा वाहतूक व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ऑगस्ट  पासून सुरु होणाऱ्या  वातानुकूलित ‘मुंबई दर्शन  सहली’ बाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंहमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनीबेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटीलबेस्टचे  अध्यक्ष निंबाळकर तसेच इतर मान्यवर पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी उपस्थित ‍ होते.
रावल म्हणाले की, दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ११:३० वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाटिया बाग,छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे वातानुकूलित मुंबई दर्शन सहल बसचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  मुंबई दर्शन हा शासनाच्या पर्यटन श्रुष्टीतील महत्वाचा उपक्रम असूनया मुंबई सहलीमध्ये देशी-विदेशी पर्यटकांस महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन होईल या दृष्टीने  पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात बदल व्हावे व मुंबईतील पर्यटन स्थळांची जगभर प्रसिद्धी व्हावी हा या उपक्रमाचा हेतू आहेअसेही श्री. रावल या वेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad