मुंबई, दि. 18 Aug 2016 : राजभवन येथे आढळलेल्या बंकरचे सुयोग्य जतन व्हावे, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झालेल्या बैठकीत झाला.
राजभवन येथे आढळलेल्या बंकरचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्यपाल राव यांनी बैठक घेतली. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, छत्रपती शिवाजी वास्तु संग्रहालयाचे संचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे विभागीय संचालक (पश्चिम) डॉ. नाभिराजन, वेस्टर्न नावल कमांडचे कमोडोर सुनील बालकृष्णन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
समितीने बंकरच्या रचनेचा अभ्यास करुन संवर्धन आराखडा तयार करावा. त्यानुसार बंकरच्या संवर्धनाविषयी उपाय आखण्यात येतील, असा निर्णय यावेळी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता किडे यांनी समितीच्या कामाचे समन्वयन करावे, तसेच आवश्यक तिथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन यांचीही याकामी मदत घ्यावी, असे ठरले.
No comments:
Post a Comment