साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2016

साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या

मुंबई - गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकाऱ्यांची संख्या ३५ आहे. जानेवारी २०१० ते जून २०१६ या कालावधीत १९७ जणांनी आयुष्याचा अंत करून घेतला आहे. उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जापर्यंतचे ३५ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदापर्यंतचे १६२ कर्मचारी यांनी जीवन संपवले आहे. गृह विभागाकडून ‘आॅनड्युटी’ आत्महत्यांचा तपशील मिळविला असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश घटनांमागे बंदोबस्त, कामाचा ताण, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह असल्याचे तपासातून पुढे आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad