आंबेडकर भवनमधील बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसवर ताडपत्री टाकण्याची सूचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2016

आंबेडकर भवनमधील बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसवर ताडपत्री टाकण्याची सूचना

मुंबई - दादर येथील आंबेडकर भवनमधील बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसवर ताडपत्री टाकण्याची सूचना उच्च न्यायालयाने गुरूवारी केली. न्या. शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पावसामुळे प्रेसचे नुकसान होत आहेे. तेव्हा प्रेसच्या जागेवर तात्पुरती शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने करण्यात आली. न्यायालयाने ही प्रेस तेथून दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. यास प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला. अखेर न्यायालयाने प्रेसवर ताडपत्री टाकण्याची सूचना केली. ही प्रेस स्वखर्चाने दुरूस्त करण्याचा प्रस्ताव ट्रस्टकडून ठेवण्यात आला. यास प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला. या सुनावणीत पक्षकार म्हणून राजेंद्र पवार व विठ्ठल आसावरे यांनी अर्ज केला आहे. यावर येत्या 30 ऑगस्टला सुनावणी होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad