मुंबई, दि. 5 : यापुढे हेल्मेटशिवाय पेट्रोल घेणाऱ्या दुचाकीस्वारांचे क्रमांक पंपचालक संबंधित प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यास कळविणार अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहन चालकांनी व त्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर धोरणाबाबत विधानसभेत चर्चा होऊन मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत मार्ग काढावा असे सूचित केले. त्यानुसार पेट्रोल पंप चालकांनी हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारास पेट्रोल दिल्यानंतर अशा वाहनांचे क्रमांक संबंधित प्रादेशिक/उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यास पाठवावे. सदर माहिती देण्याची वारंवारिता व पद्धत संबंधित प्रादेशिक/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे ठरवून देतील असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रावते यांनी निवेदनाद्वारे दिले.
No comments:
Post a Comment