‘महाड दुर्घटना’ - नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

‘महाड दुर्घटना’ - नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

अलिबाग दि.3 :- मुंबई गोवा महामार्गावरील महाड पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदीवरील पुल काल रात्री 11.30 च्या दरम्यान पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामध्ये दोन एस.टी.बसेस तसेच काही खाजगी गाडया वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. त्याबाबत शोध मोहिम युध्द पातळीवर सुरु आहे.

या संदर्भात वाहून गेलेल्या राजापूर-बोरीवली व जयगड-मुंबई या एस.टी. तील प्रवाशांच्या नातेवाईकांनी, तसेच खाजगी बेपत्ता वाहनातील नागरीकांच्या नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. संपर्कासाठी क्रमांक 02141-222118 तसेच 1077 टोल फ्री क्रमांक रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष. मुंबई सेंट्रल बसस्थानक 022-23074272, 23076622, महाड बस स्थानक 02145-222139, 222102, पोलादपूर बसस्थानक 02191- 240036, चिपळूण बसस्थानक 02355-252003, 252167, रत्नागिरी बसस्थानक 02352-222102, 222253, राजापूर बसस्थानक 02353-222029, 222218 असे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad