पवई तलाव मगर उद्यान म्हणून घोषित करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2016

पवई तलाव मगर उद्यान म्हणून घोषित करा

मुंबई : पवई तलावात मोठय़ा प्रमाणावर मगरी असल्याने हा तलाव मगर उद्यान म्हणून विकसित करा, या शिवसेनेच्या मागणीनंतर आता काँग्रेसनेही ही मागणी उचलून धरली आहे. याबाबतच्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मांडली आहे.

महापालिकेचे तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम पवई तलाव मगर उद्यान म्हणून विकसित करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी सभागृहात विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी ही मागणी उचलून धरली आहे. या तलावात काही वाहनचालक वाहने धुतात. तसेच तलावात अनधिकृतपणो मासेही पकडले जातात. त्यामुळे तलावातील मासे आणि मगरींच्या जीवाला धोका पोहचत असून तलावातील हे नैसर्गिक वैभव नष्ट होता कामा नये. तलावातील हे जैववैविध्यही धोक्यात आले आहे. शिवाय तलावातील मगरींची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पवई तलाव मगरीचे उद्यान म्हणून घोषित करावे. तसे केल्यास हे मुंबईतील पहिले मगर उद्यान ठरेल आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात भरच पडणार असल्याचे छेडा यांनी या ठरावाच्या सूचनेत नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad