रत्नागिरी, दि.03 : रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षातून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 03 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 1 वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर 02 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्री पोलदपूर - महाड रस्त्यावर सावित्री नदीचा पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सदर मार्गावर रत्नागिरी जिल्हयातील जयगड-मुंबई व राजापूर-बोरवली या एस्टी बसेस वाहून गेल्या आहेत.
जयगड-मुबई (गाडी क्र.एम एच 20 - 1538 ) सायंकाळी 6.30 वरुन मार्गस्थ झाली होती. सदर गाडीवर चालक श्रीकांत शामराव कांबळे, बि.नं.8234 वय 58 वर्षे रा.सावर्डा पोलीस लाईन, चिपळूण. वालक विलास काशिनाथ देसाई बि.नं.38865 वय 43 वर्षे रा.सती,ता.चिपळूण हे होते. सदर गाडीमध्ये सत्कोंडी, ता. रत्नागिरी येथील सुनिल महादेव बैकर, वय 35 वर्षे, मोबाईल क्रमांक 9667449908 , स्नेहा सुनिल बैकर, 30 वर्षे मोबाईल क्रमांक 9667449908, दिपाली कृष्णा बलेकर (भुमी भुषण बसेकर), अनिल संतोष बलेकर, नातेवाईकाचे नांव प्रमोद महादेव बैकर मोबाईल क्रमांक 7745065502 व 9545465502 असे आहेत. भंडारपुळे, ता.रत्नागिरी येथील प्रशांत प्रकाश माने, वरवडे ता. रत्नागिरी येथील धोडू बाबाजी कोकरे वय 65 वर्षे, कांबळे लावगण, ता. रत्नागिरी येथील अविनाश सखाराम मालप वय 68 वर्षे आणि राजापूर ता.राजापूर येथील जितू जैतापकर वय 32 वर्षे आदि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
राजापूर -बोरीवली (गाडी क्र. एम एच 40 एन 9739) सदर गाडीवर चालक गोरखनाथ सितारा मुंडे, बि.नं.18759 वय 46 वर्षे रा.गंगाखेड,परभणी. वालक प्रभाकर भानूराव शिर्के बि.नं.13807 वय 58 वर्षे रा.राजवाडी ता.संगमेश्वर हे होते.गाडीमध्ये लॅण्डसन पार्क, काविळतळी, ता. चिपळूण येथील आतीफ मेमन चौगुले मोबाईल क्रमांक 7715814378, आवेद अल्ताफ चौगुले, नातेवाईकाचे नांव अहमद चौगुले, मोबाईल क्रमांक 8097248420 असा आहे. नाणार ता. राजापूर येथील बाळकृष्ण बाब्या वरक, वय 51 वर्षे, जयेश बाणे वय 36वर्षे, रा.सोलगांव, ता.राजापूर. अजय सिताराम गुरव, वय 40 वर्षे, रा.ओणी, ता.राजापूर आणि वाघू आदि प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड-कुणबीवाडी येथील 1 तवेरा गाडी दि.2 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी मुंबईच्या दिशेने निघाली होती. तवेरामध्ये आठ लोक आहेत. त्यातील एका व्यक्तीचे नांव दिनेश कांबळी असेअसून त्याचा मोबाईल क्रमांक 9423262859 असा आहे. तसेच नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रमेश कदम, रा.नांदिवसे ता.चिपळूण हे दि.2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईला निघाले होते, परंतु सद्यस्थितीत त्यांच्याशी संपर्क होत नाही. सदरची माहिती सुशांत मोहिते, मोबाईल क्रमांक 9403579849 यांनी दिली आहे. उपरोक्त माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment