घाटकोपरमध्ये १५ ऑगस्टला सायकल परिवहन सेवेचे उदघाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2016

घाटकोपरमध्ये १५ ऑगस्टला सायकल परिवहन सेवेचे उदघाटन

मुंबई / प्रतिनिधी 11 Aug 2016
१५ ऑगस्ट रोजी घाटकोपरमध्ये मुंबई महानगरपालिका परिमंडळ ६ यांच्या सौजन्याने व भिमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान संचलित सायकल परिवहन सेवेचे स्थानिक आमदार राम कदम यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे. 


घाटकोपर पश्चिम येथील समाजकल्याण केंद्र मैदान, भटवाडी येथे दुपारी २ वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास नानजीभाई ठक्कर (ठाणावाला), शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, मराठी साहित्यिक किमंतू ओंबळे, नगरसेवक दिपक हांडे, नगरसेविका रितू तावडे, नगरसेविका प्रतिक्षा घुगे, पालिका परिमंडळ ६ चे उपायुक्त किशोर क्षिरसागर, संजय खंदारे, सुहास करवंदे, एन विभाग सहाय्यक आयुक्त एस. एम. व्दिवेदी, एम. इ. टी. च्या रिसर्च हेड डॉ. निर्मला जोशी, आनंद जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी भटवाडी ते घाटकोपर रेल्वे स्थानक सायकल रॅली काढणार असल्याची माहिती भिमाशंकर प्रतिष्ठानचे किसन गोपाळे यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad