घरातील बदलाबाबतची परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2016

घरातील बदलाबाबतची परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ

मुंबई / प्रतिनिधी 8 Aug 2016 - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात वाढलेल्या कुटुंबामुळे किंवा तत्सम कारणामुळे असलेल्या घरात काही बदल करण्याची गरज काळानुरुप निर्माण होतेहे बदल सहजपणे करता यावेत्यात अडचणी येऊ नये यासाठी आता महापालिकेच्या स्तरावर अनेक सकारात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेतया सुधारणांमध्ये 'मुंबई महापालिका अधिनियम'कलम ३४२ नुसार अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरुपाच्या प्रस्तावांबाबत (Miscellaneous Proposals) परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे


किरकोळ स्वरुपाच्या प्रस्तावांमध्ये जागांचे एकत्रीकरण करणेदरवाजे काढणेखिडक्यांचा आकार मोठा करणेकार्यालयात केबिन तयार करणेकिचनमधील ओट्याची जागा बदलणे इत्यादी बाबींचा समावेश होतोया प्रकारच्या परवानगी प्रक्रियांसाठी यापूर्वी सुटसुटीत पद्धत नव्हतीत्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होतीमात्र आता या सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यावर संबंधित परवानगी त्वरित मिळणे शक्य होणार आहेया सुलभीकरणाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज मंजूरी दिली आहे.

तसेच मुंबई महापालिका अधिनियम कलम ३४२ नुसार इमारतीच्या अंतर्गत स्तरावरील 'टेनंटेबल रिपेअर्ससाठी परवानगीची गरज नसतेया बाबींमध्ये इमारतींच्या आरसीसी बाबींचे मजबूतीकरण करण्यासाठी गनायटींग करणेप्लास्टरींग करणेरंगकाम करणेफरश्या बदलणे,संडासाचे भांडे बदलणेविद्युत विषयक दुरुस्ती करणे आदी बाबींचा समावेश पूर्वीपासूनच आहेयामध्ये आता महापालिकेच्या सुधारित धोरणानुसार 'उघडता येईल असा घराचा सुरक्षा दरवाजा' (सेफ्टी डोअर)आणि 'खिडक्यांच्या जाळी' (ग्रीलयांचा समावेश करण्यात आला आहे.यामुळे आता घराला सेफ्टी डोअर बसविणेखिडक्यांना जाळी बसविणे या बाबींसाठी महापालिकेची परवानगी घेण्याची गरज असणार नाही. तथापि,खिडक्यांना बसविण्याची जाळी ही आवश्यकतेनुसार सहजपणे उघडता येईल अशा प्रकारची असणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई महापालिका अधिनियम कलम ३४२ नुसार अंतर्गत-रचना बदलांबाबतच्या किरकोळ स्वरुपाच्या प्रस्तावांबाबत (Miscellaneous Proposals) ऑनलाईन प्रस्ताव सादर करताना त्यासोबत अर्जदाराचे घोषणापत्र (Declaration) असणे आवश्यक असणार आहेतसेच सदर ऑनलाईन प्रस्ताव हा नोंदणीकृत वास्तुविशारद (Registered Architect) वा अनुज्ञप्तीधारक सर्वेक्षक (License Surveyor) यांचे स्वयंप्रमाणिकरण ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक असणार आहेसध्या ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यास सुरुवात करण्यात येत असून लवकरच ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.

ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे किंवा इमारत पूर्णत्त्वाचा दाखला देण्यात आलेला आहे किंवा ज्या इमारतींचा 'Tolerated Category' मध्ये समावेश आहेअशा इमारतींमध्ये परवानग्या ऑनलाईन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 

त्यामध्ये खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे:
  • घर सदनिकादुकानकार्यालयेऔद्यागिक जागा इत्यादींबाबत इमारतीच्या मूळ बांधकामाला धक्का लागणार नाहीया पद्धतीने अंतर्गत भिंत हटविणेअंतर्गत दरवाजे काढणे,खिडकीचा आकार मोठा करणे इत्यादी
  • विकास नियंत्रण नियमावली तसेच संबंधित नियमांच्या अधीन राहून सदनिका घर दुकान औद्योगिक जागा इत्यादींमधील खोल्या एकत्र करणे किंवा त्यातील अंतर्गत सुधारणा करणे(Alteration and Amalgamation of House / Flats / Shops / Offices / Industrial Units / Premises etc)
  • विकास नियंत्रण नियमावलीच्या अधीन राहून कार्यालयातील केबीन तयार करणे
  • किचन मधील ओट्याची जागा बदलविणे किंवा त्याची उंची कमी जास्त करणेमात्र हे करताना सांडपाणी व्यवस्थेमध्ये(Plumbing Outlet) कोणताही बदल होणार नाही याची खबरदारी घेणे
  • सांडपाणी व मलनिःसारण व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही याची काळजी घेत 'बाथरुमटॉयलेट ब्लॉकमध्ये यथोचित बदल करणे
  • 'विकास नियंत्रण नियमावलीतसेच संबंधित तरतूदींच्या अधिन राहून किचनऔद्योगिक जागादुकान इत्यादी ठिकाणी विशिष्ट उंचीचा व विशिष्ट आकाराचा लॉफ्ट बांधणे
  • या अंतर्गत सादर करण्यात येणारे प्रस्ताव नोंदणीकृत वास्तुविशारद (Registered Architect) वा अनुज्ञप्तीधारक सर्वेक्षक (License Surveyor) यांचेद्वारे सादर करावयाचे आहे
  • सदर प्रस्तावासह वास्तूरचनाकार वा अनुज्ञप्तीधारक सर्वेक्षक यांचे स्वयंप्रमाणिकरण तसेच अर्जदाराचे घोषणापत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक असणार आहे
  • परवानगी प्रक्रियेबाबत आवश्यक ते शुल्क ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad