मुंबई, दि. १० : राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अधिक गतिमान करण्यासाठी येत्या २२ ऑगस्टते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गतराज्यातील शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरित केले जाणारआहे. त्याबरोबरच येत्या वर्षभरात राज्यातील १३ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजनकरण्यात आले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात आज पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले असून सर्व पालकमंत्री, पालक सचिवयांनी या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशनला गती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले असल्याची माहितीही मंत्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
मंत्री लोणीकर म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडीघेतली आहे. राज्यातील सिंधुदुर्ग हा संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला असून ७ हजार ३०४ ग्रामपंचायती आणि१५ तालुके पुर्णत: हागणदारीमुक्त झाले आहेत. या अभियानाला यापुढील काळात अधिक गतिमान करण्यातयेणार असून येत्या वर्षभरात राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे, सांगली, पुणे, वर्धा, नागपूर, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, पालघर आणि जालना हे १३ जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.याशिवाय, येत्या २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांनाशौचालय बांधण्यास प्रेरित केले जाणार आहे. यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम, गृहभेटी, आयईसीकार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शौचालयाच्या आवश्यकतेविषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविलेजाणार आहेत. सर्व पालकमंत्री, पालक सचिव, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,स्वयंसेवी संस्था, कलाकार आदींच्या सहभागातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देऊन लोकांपर्यंतशौचालयाचे महत्व पोहोचविले जाईल. महात्मा गांधी जयंती दिनी अर्थात २ ऑक्टोबर रोजी राज्यभरात‘महास्वच्छता दिन’ साजरा करुन या मोहिमेला अधिक गतिमान केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनीयावेळी दिली.
मंत्री लोणीकर म्हणाले की, मनरेगा योजनेतून शौचालये बांधण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीअसून याकामी ६०:४० ची अट शिथील करण्यात आली आहे. याशिवाय शौचालय बांधणीसाठी पूर्वी असलेले ४हजार रुपयांचे अनुदान वाढवून ते आता १२ हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय बांधणीस मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होणार असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त केला जाईल, असे तेम्हणाले.
No comments:
Post a Comment