मुंबई, दि.2 : एसआरए प्रकल्पाच्या विकासकाने सभासदांची केलेली फसवणूक याबाबत एसआरएचे संबंधित अधिकारी, विकासक यांच्यासमवेत आपण लवकरच बैठक घेऊ, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
अंधेरी येथील अमन, आकाश, आशियाना-ए आणि आशियाना-बी या एसआरए प्रकल्पासंदर्भातला प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य हरिष पिंपळे, योगेश सागर, आशिष शेलार यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता. वायकर म्हणाले की, या प्रश्नाबाबत विधानसभा सदस्य यांनी सांगितलेली माहिती खरी मानून या प्रकल्पाबाबत संपूर्ण चौकशी करण्यात येईल तसेच याबाबत सविस्तर बैठकही लवकरच घेण्यात येईल.
No comments:
Post a Comment