मुंबई, दि.2 : रायगड जिल्हयातील रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रात कचरा टाकला जाऊ नये याबाबत तत्काळ निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
कुंडलिका नदीत पाणी टाकून पात्र बुजविण्यात येत असल्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य भरतशेठ गोगावले यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.
फडणवीस म्हणाले की, विधानसभा सदस्यांनी विधानसभेत दिलेली माहिती खरी मानून याबाबत तत्काळ सूचना देण्यात येतील. याशिवाय आता राज्य शासनामार्फत डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा देण्यात येत नसून कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणाऱ्या नगरपालिकांच्या प्रकल्पांना अनुदान देण्यात येत आहे. नदीसंवर्धन योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येते. तथापि, रोहा नगरपरिषदेने कुंडलिका नदीघाट सुशोभिकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर केला असून या प्रस्तावाची छाननी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment