मुंबई, दि. 2 : औद्योगिक क्षेत्रात जमिनी प्राप्त होऊनही विकसित न करणा-या विकासकांच्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई सुरु करु. जे उद्योजक तत्काळ उद्योग सुरु करतील त्यांनाच जमीन देण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.
औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमबाह्य वापरात असलेल्या भूखंड परत घेण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य संग्राम थोपटे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना उद्योगमंत्री बोलत होते.
देसाई म्हणाले की, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील भूखंड विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन वितरण केलेले असल्याने परत घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
ज्या कारणासाठी भूखंड वितरण केला आहे त्यासाठी वापर होत नसल्यास त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच जे तत्काळ उद्योग उभारतील त्यांना त्वरित भूखंड वितरीत केले जाणार आहे, असेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment