मुंबई 12 Aug 2016 : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला चिपळूण-कराड रेल्वे मार्ग अखेर रेल्वे ट्रँकवर येणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी कंपनीमध्ये रविवारी रे्ल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणाला रेल्वे मार्गाने पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे४६४ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. तसेच या प्रकल्पाला प्राधान्य देण्याची मागणी राज्य शासनाने केंद्र शासनाला केली होती. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला २0१३ मध्ये सुरुवात झाली होती. सर्वेक्षणांनतर या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे सरसावली असून, पीपीपी तत्त्वावर शापूरजी पालनजी कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे. रविवार, १४ ऑगस्ट रोजी सह्याद्री गेस्ट हाऊस येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी १0.३0 वाजता करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होणार आहे. चिपळूण-कराड या १0२ किलोमीटरच्या अंतरासाठी नियोजित रेल्वेमार्गावर ६ रेल्वे स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ९२८.१0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर लहान-मोठे १६ बोगदे असून त्यामधील कुंभार्ली घाटातील बोगदा १२.८ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आल्यानंतर चिपळूण रेल्वे स्थानकाला रेल्वे जंक्शनचा दर्जा मिळणार आहे.
कोरेने यंदा मान्सूनमध्ये चांगली कामगिरी केली असून गाड्यांचा वक्तशीरपणा या महिन्यात ९४ टक्के इतका असून यंदा गणेशोत्सवात २५0 हून अधिक गाड्या चालवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैभववाडी मार्गासाठी रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार झाला असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. तसेच येत्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांच्े भूमिपूजन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी टर्मिनस फेझ २चे बांधकामदेखील सुरू करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला ३१ ऑक्टोबरला सुरुवात
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला आणि विद्युतीकरणाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचा सुरुवात करण्यात येणार होता; परंतु जानेवारी २0१६ मध्ये प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण केल्यानंतर वर्षाला सुमारे १00 कोटी रुपयांची बचत होणार आहे. कोकण रेल्वेच्या चिपळूण-कराड प्रकल्पामुळे कोकण आणि महाराष्ट्राचा फायदा होणार आहे. रोहा ते वीर या ४६ किमीच्या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाऊस थांबताच नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
रत्नागिरीत रेल्वे इंजिनीअरिंगचा कोर्स
कोकणमार्गावरील नवीन ११ स्थानकांचे कामही लवकरच सुरू होणार असून सावंतवाडी टर्मिनसच्या दुसर्या टप्प्याच्या कामाच्या कोनशिला समारंभासह अनेक कार्यक्रम येत्या पंधरवड्यात होणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने प्रथमच रत्नागिरीत रेल्वे रिसर्च सेंटर स्थापण्यात येणार असून रेल्वे इंजिनीअरिंगचा कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment