मुंबई / प्रतिनिधी 10 Aug 2016 - बृहन्मुंबई महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाच्या क्षेत्रातील हाजी अली दर्ग्याकडे जाणा-या मार्गावर असणारी ७५ अनधिकृत दुकाने / अतिक्रमणे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी वकिल महोदयांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त प्रविण पडवळ आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या 'जी दक्षिण'विभागाद्वारे ही कारवाई संयुक्तपणे करण्यात आली आहे, अशी माहिती 'जी दक्षिण' विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे.
आज करण्यात आलेली संयुक्त कारवाई दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरु करण्यात आली व ही कारवाई संध्याकाळ पर्यंत सुरु होती. या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील ५० जणांच्या चमूसह महापालिकेचे ३० कामगार, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या कारवाईसाठी १ जेसीबी, ३ डंपर वापरण्यात आले. हाजी अली दर्ग्याकडे जाणा-या अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईमुळे सदर रस्ता मोकळा होण्यास मदत झाली आहे
No comments:
Post a Comment