केइएम मध्ये ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' चे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2016

केइएम मध्ये ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' चे आयोजन

मुंबई / प्रतिनिधी 11 Aug 2016 -  उद्याच्या डॉक्टरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींशी चर्चा करता यावी, आजार व उपचार पद्धतींबाबत वैद्यकीय क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन व बदल याबाबत माहिती व्हावी, या मुख्य उद्देशाने महापालिकेच्या केइएम रुग्णालय व गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' चे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी शुभारंभ होणा-या 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' च्या उद्घाटनाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


'कॉनफ्ल्यूएन्स' ची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना 'Future of Medicine' ही असणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दि. ११ ते १३ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित करण्यात येणा-या 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६'ला देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे सुमारे १ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर यांनी दिली आहे.

'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' मध्ये वैद्यकीय विषयांवरील चर्चासत्रे, मान्यवरांची व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण (Research Paper Presentation), कार्यशाळा (Workshop), वैद्यकीय चित्रफितींचे सादरीकरण, वैद्यकीय विषयांशी निगडीत अभिनव प्रश्नमंजुषा स्पर्धा, वैद्यकीय विषयांवरील वादविवाद स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची माहिती व्हावी, या उद्देशाने 'कॉनफ्ल्यूएन्स २०१६' आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कॉनफ्ल्यूएन्स च्या संयोजिका प्रा. डॉ. स्मृती बाजपेयी - तिवारी यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad