मुंबई 10 Aug 2016 - बोरिवली (पश्चिम) येथील महापालिकेचे `प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़गृह येथील मुख्य नाटय़मंदिर’ची दुरुस्ती करण्यात येणार असून, याकरीता दिनांक ०१ सप्टेंबर, २०१६ ते दिनांक १० सप्टेंबर, २०१६ या कालावधीत हे मुख्य नाटय़मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
हे नाटय़मंदिर वर्षभर सतत कार्यक्रम सुरु असल्याने नाटय़मंदिराच्या देखभालीची सर्वच कामे करता येत नाहीत. सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी संयंत्रांना वंगण घालणे, मुख्य पडदा, विंगा उतरवून साफ करणे, रंगमंचास रंगरंगोटी करुन घेणे इत्यादी कामे नाटय़गृह बंद ठेवल्याशिवाय करता येत नाहीत. साधारणपणे गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्मात्यांची नाटय़गृहास मागणी नसते, तसेच प्रेक्षकही कमी असतात. त्यामुळे या कालावधीत नाटय़गृहे देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्याची प्रथा आहे.
इतर उपक्रमांच्या बाबतीत मुख्य नाटय़गृहासारखे सतत आरक्षण नसल्याने जेव्हा कार्यक्रम नसतात त्यावेळी देखभालीची कामे केली जातात. केवळ मुख्य नाटय़गृह दिनांक ०१ सप्टेंबर, २०१६ ते दिनांक १० सप्टेंबर, २०१६ पर्यंत दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, इतर उपक्रम सुरुच राहतील. सर्व संबंधीतांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे पालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment