मातंग आणि बौद्धांसह सर्व दलितांनी एक व्हावे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आठवलेंचे आवाहन
नविदिल्ली दि 1 --- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील दलित शोषित वर्गाच्या वेदनेचा हुंकार मांडणारे क्रान्तिकारी साहित्य निर्माण केले अण्णाभाऊंचा क्रान्तिकारी साहित्यरत्न म्हणून आम्हाला सदैव अभिमान आहे जागतिक कीर्तीच्या साहित्यरत्नाच्या आज 96 व्या जयंतीनिमित्त त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करायची असेल तर मातंग आणि बौद्धांसह देशभरातील सर्व दलितांनी एक व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते तथा केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज केले
नविदिल्लीतील शास्रीभवन मधील सामाजीकन्याय मंत्रालयाच्या कार्यालयात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 96 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नामदार रामदास आठवलेंनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव असे लोकप्रिय कवण लिहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपली वैचारिक बांधीलकी जाहीर करून समस्त दलित शोषित वर्गाला आपला उत्थाणाचा मार्ग डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गानुसारच होणार असल्याचा संदेश दिला होता डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अण्णाभाऊ साठेंनी सदैवआदर व्याक्त केला होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करताना मातंग बौद्धांसह सर्व दलितांनी एकजूट करन्याचा निर्धार करावा असे आवाहन नामदार रामदास आठवलेंनी केले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे साहित्य जागतिक दर्जाचेव आणि जगभरातील शोषित वंचित वर्गाला संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे आहे त्यांनी साहित्य निर्माण केले त्यांनी लोहिलेल्या 35 कादंबरी गाजल्या फकिरा कादंबरी जगप्रसिद्ध आहे अनेक भाषान्मध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे 13 नाटके; 1प्रवासवर्णन; 14 वगनाट्ये आणि 10 पोवाडे आणि त्यांची शाहिरी जनमानसात लोकप्रिय होती यासर्व साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी क्रांतीची मशालच पेटविली होती असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले
No comments:
Post a Comment