रा. से. यो. तर्फे मेगा मान्सून मॅरेथॉन मधून वैश्विक तापमानवाढी विषयी जनजागृती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2016

रा. से. यो. तर्फे मेगा मान्सून मॅरेथॉन मधून वैश्विक तापमानवाढी विषयी जनजागृती

भाईंदर (प्रतिनिधी) 16 Aug 2016 – दिवसेंदिवस ग्लोबल वार्मिंग म्हणजेच वैश्विक तापमानवाढ या समस्येकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी शंकर नारायण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शाखेच्या वतीने पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने रविवार, 21 ऑगस्ट रोजी आंतर महाविद्यालयीन मेगा मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्लोबल वार्मिंग ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आज संपूर्ण जगासमोर भेडसावत असलेल्या सगळ्या समस्यांपेक्षा सर्वांत भयानक अशी ही समस्या आहे आणि हे संपूर्ण जगाने मान्य केले आहे कालानुरूप मानव प्रगती करत गेला, औद्योगिक क्रांती झाली मात्र हीच औद्योगिक क्रांती ‘ वैश्विक तापमानवाढी ’ चे प्रमुख कारण होवून बसली आहे. हरीतवायूचे मोठया प्रमाणावरील उत्सर्जन वैश्विक तापमानवाढीला कारणीभूत ठरले आहे. सर्वच देशांनी औद्योगिक क्रांतीचा मार्ग अवलंबिला आहे, त्यामुळे सगळ्याच देशातून हरीतवायू उत्सर्जित केले जातात मात्र हेच वैश्विक तापमानवाढीला जबाबदार ठरले आहेत. वैश्विक तापमानवाढीमुळे अनेक हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, बर्फाच्छादित पर्वत तसेच खंड वितळत चालले आहेत. यामुळे अनेक देशांच्या सरासरी तापमानात वाढ होत चालली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून भविष्यात अनेक महत्वाच्या शहरांना धोका संभवत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे हरीतवायूचे उत्सर्जन आटोक्यात आणणे हाच संदेश राष्ट्रीय सेवा योजना तर्फे ' मेगा मान्सून मॅरेथॉन ' मधून देण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील 556 महाविद्यालया पर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयातील युवा विद्यार्थी या मॅरेथॉन मध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन धावणार आहेत. शंकर नारायण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शाखेच्या वतीने आयोजण्यात आलेल्या स्पर्धेचे हे 8 वे वर्ष आहे. या मेगा मान्सून मॅरेथॉनच्या माध्यमातून वैश्विक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वार्मिंगच्या समस्येकडे लक्ष वेधले जाणार आहे. सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक वैश्विक तापमानवाढ विषयी सामाजिक संदेश लिहिलेले टी-शर्ट परिधान करणार आहे. मान्यवर यांना पुष्पगुच्छ म्हणून तुळसी, निंब याचे रोप देण्यात देणार आहेत. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांना प्रमाणपत्र प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीतून देण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नातून युवापिढी, जनतेला वैश्विक तापमानवाढ रोखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक जागरूक करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील 556 महाविद्यालयातून तसेच ग्रामीण भागातून 20 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या शाखेचे सर्व युवा विद्यार्थी सज्ज झाले. असून जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि ग्लोबल वार्मिंग या सामाजिक प्रश्नाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन शंकर नारायण महाविद्यालय कडून करण्यात आले आहे. तसेच या मॅरेथॉनमध्ये प्रथम पारितोषिक रोक रक्कम सात रुपये, द्वितीय पारितोषिक रोक रक्कम पाच रुपये, तृतीय पारितोषिक रोक रक्कम तीन रुपये तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रा.से. योजना विद्यार्थी समन्वयक शाहरुख मुलाणी 9867733766 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad