मुंबई, दि. १ : सोलापूर जिल्ह् यातील बार्शीसारख्या ग्रामीणभा गातील बचत गटांच्या वस्तुंचे मुं बईमध्ये प्रदर्शन भरविणे हाकौतु कास्पद उपक्रम आहे. ग्रामीण भा गातील बचतगटांना मुंबईचीबाजारपे ठ उपलब्ध करुन देण्यासाठी आरएसए म समाजसेवा संस्थेनेराबविलेल्या या उपक्रमातून बचतगट चळवळीला निश्चितच प्रेरणामिळेल, असे प्रति पादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी स यांनी आज येथे केले.
येथील सचिवालय जिमखाना येथे बचत गटांद्वारे उत्पादितवस्तुंच्या या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यां च्या हस्ते आज उद्घाटन झाले,त् यावेळी ते बोलत होते. यावेळी वि त्त मंत्री सुधीर मुनगंटीवार,ग् रामविकास आणि महिला - बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत् रीसुभाष देशमुख, परिवहन राज्यमं त्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पा लकमंत्रीविजय देशमुख, आरएसएम समा जसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद् र मिरगणेयांच्यासह बचत गटांचे प् रतिनिधी उपस्थित होते.
बार्शी (जि. सोलापूर) येथील आरए सएम समाजसेवा संस्थेमार्फतया प् रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन आणि विक्री आजआणि उद्या (दि. २ ऑगस्ट) पर्यंत सु रु राहणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, सोलापू र जिल्ह्यातील अनेक चांगल्या ववे गवेगळ्या चवीच्या खाद्यवस्तू या प्रदर्शनात उपलब्ध असूनसोलापू रच्या पदार्थांची चवच वेगळी आहे . बचटगट चळवळीला प्रोत्साहनदेण् यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. बचट गटांना सर्वतोपरी मदतीसाठी राज्य शासन नेहमीच त्यांच्या पा ठीशी राहील, असे तेम्हणाले.
बचत गटांमार्फत ग्रामीण विकासाला चालना – पंकजा मुंडे
बचत गट उत्पादनांची पाहणी करताना प्रतिक्रिया देताना ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की,आरएसएम समाजसेवा संस्थेमार्फत आयोजित हा उपक्रम चांगला आहे.स्थानिक, ग्रामीण पातळीवरील रोजगाराला यातून मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. बचतगटांमार्फत ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस् ते ‘मदरटच’ या लोगोचेही अनावरणक रण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह या वेळी उपस्थित मंत्र्यांनी बचतगटां च्यास्टॉलला भेट देऊन उत्पादनां ची माहिती घेतली.
No comments:
Post a Comment