अमिन पटेल, सुनिल प्रभू आणि वर्षा गायकवाड मुंबईतील सर्वोत्कृष्ठ आमदार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

अमिन पटेल, सुनिल प्रभू आणि वर्षा गायकवाड मुंबईतील सर्वोत्कृष्ठ आमदार

सर्वोत्कृष्ठ १० मध्ये काँग्रेसचे पाच, शिवसेनेचे तीन आणि बीजेपीचे दोन आमदार
काँग्रेस, शिवसेना, समाजवादी सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करणारे पक्ष
मुंबई :२ ऑगस्ट २०१६: अजेयकुमार जाधव 
प्रजा फाऊंडेशनने मुंबईमधील आमदारांच्या गुणपत्रिकेला आज मुंबई प्रेस क्लब येथे प्रकाशित केले. यात मुंबई स्थित ३१ आमदारांच्या प्रदर्शनाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ठ तीन आमदारांमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल (८४.३३%), शिवसेनेचे सुनिल प्रभू (८०.९७%) आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (७९.४०%) नामांकित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ठ १० आमदारांमध्ये मध्ये पाच आमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे आणि बीजेपीचे दोन आमदार आहेत. तर सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करणा करणाऱ्या पक्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (७६.८३), शिवसेना(६३.२५) आणि समाजवादी पार्टी(६३.०४) यांचा समावेश आहे. 

प्रजाचे प्रोजेक्ट डायरेक्टर, मिलिंद म्हस्के म्हणाले की,”गेल्या (१२वी)विधानसभेमध्ये आमदारांच्या सरासरी गुणांनी चार गुणपत्रिकांवर घट दाखवली आहे. २०११मध्ये ती ६१.२२% पासून २०१४ मध्ये ५९.१७% होती. परंतू पहिल्यादाच प्रथम दोन आमदार-अमिन पटेल(८४.३३%) आणि सुनिल प्रभू(८०.९७%) यांनी प्रदर्शनासाठी ८०%हून जास्त गुण कमावले. २०१४ मध्ये ५७% लोकांना असे वाटले की शासन आणि आमदार अतिशय भ्रष्ट आहेत आणि २०१४ मध्ये ६०% नागरिकांना असे जाणवले की त्यांच्या जीवनाच्या दर्जामध्ये सुधार होत आहे. तर २०१६ मध्ये ३६% लोकांना वाटले की शासन आणि आमदार अतिशय भ्रष्ट आहेत आणि २०१६ मध्ये ७०% लोकांना असे जाणवले की त्यांच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा झाली आहे. 

२०११ मधल्या १२ व्या सदनाच्या पहिल्या गुणपत्रिकेतल्या सरासरी ६१.२३% गुणांची आणि २०१६ मधल्या सरासरी ६५.११% गुणांची तुलना करता, असा पुरावा आहे की प्रदर्शनाच्या दरामध्ये अत्यल्प वाढ झाली आहे. गुण २०११ मधल्या ७१.१४% पासून २०१६मध्ये ७९.०७% वर पोहोचले आहेत. तर तळाशी असलेले प्रातिनिधि जवळपास त्याच पातळीवर राहिले २०११ मध्ये ५२.८२% पासून ते २०१६ मध्ये ५४.३१%वर राहिले. आणि ब. कथित सुगम्यतेचे गुण २०११मध्ये ६६.०५% पासून २०१६मध्ये ४२.११%पर्यंत खाली गेले आहेत.” अशाप्रकारची असंगति प्रश्न विचारण्याच्या संख्येसाठी असलेल्या सांख्यिकीच्या भागात आढळली आहे- यामध्ये २०११मध्ये ७९४६ प्रश्नांपासून ते २०१६मध्ये ४३४३ प्रश्नांपर्यंत घट दिसून आली आहे. मुंबईचा एक आमदार अंदाजे ३, ४०,००० लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्या प्रदर्शनाचे मूल्यांकन अतिशय महत्वपूर्ण ठरते. निवडून आलेले प्रतिनिधी ख-या अर्थाने आपल्या लोकतंत्र्याच्या पुढच्या स्तरांना सेवा उपलब्ध करुन देतात हे या आकडेवारीवरून समोर येत असल्याचे निताई मेहता म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad