नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2016

नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी

रिओ, दि. 19 Aug 2016 - भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने (सीएएस) चार तास चाललेल्या युक्तीवादानंतर नरसिंग यादव डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर ऑलिम्पिकसाठी पुढील चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय दिला. तसेच, त्याची रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी सुद्धा नाकारली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) केलेल्या अपीलवर केलेल्या सुनावनीनंतर क्रीडा लवादाने नरसिंग यादवला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad