अलिबाग, दि. 09 : महाड सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घनेतील बेपत्ता व्यक्तींच शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय शोध गट तयार केले असून स्थानिकांच्या मदतीने नदीकाठी ही शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमेत उपविभागीय अधिकारी महाड सुषमा सातपुते व उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तेजस समेळ यांच्या नियंत्रणात म्हसळा, श्रीवर्धन, महाड येथील तहसिलदार व त्यांची यंत्रणा कार्यरत आहे.
आज श्री साई ड्रेजर ऑर्गनायझेशन रे, रोड यांच्या मदतीने के.एम.बी. कम्युनिकेशन डिव्हाईस 8 डायव्हर्स सह या तपास कामी मदतीस आली असून त्यांच्या मार्फत पाण्यातील तपास कार्य सुरु आहे. तसेच श्रीवर्धन तहसिल हद्दीतील हरेश्वर ते कारीवणे, शिपोळे पर्यंतच्या तसेच दिवे आगर, दिघी, वाळवटी, कोंडीवली व आसपासच्या खाडी लगतच्या सर्व सीमा, भरती ओहटी पर्यंतच्या रेखा पर्यंत तसेच खाडी लगतच्या कांदळवनामध्ये, झुडपामध्ये, खडकाजवळ स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध घेण्यात आला. तसेच म्हसळा तहसिल हद्दीतही ही शोध मोहिम सुरु असून त्यांनी आंबेत ते दासगांव दरम्यान शोध राबिवली.
एन.डी.आर.एफ. च्या जवानांचे धाडसी पथक, सर्व साहित्य सामुग्रीसह स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य करीत आहेत. 9 बोटी, 8 डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, स्थानिक मच्छिमार बांधव अशी सर्व मंडळी आपले शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी देखील नदी काठी काही आढळून आल्यास स्थानिक प्रशासनास तात्काळ कळवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment