मुंबई / प्रतिनिधी 4 Aug 2016
मुंबईमधील बेस्ट उपक्रमाने आपल्या प्रवाश्यांना बस संबंधी माहिती उपलब्ध व्हावी म्हणून ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ऍप सुरु करण्याची घोषणा बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर व महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ऍपची ही भेट प्रवाश्यांना बेस्ट दिनाची (7ऑगस्ट) भेट म्हणून मिळणार आहे. या वर्षीच्या शेवटी असेच ऍप बेस्टच्या विद्युत ग्राहकासाठीही सुरु केले जाणार आहे.
ऍपद्वारे प्रवाश्यांना कोणती बस किती वेळात बस स्टॉपवर येईल, ज्या बस मधून प्रवास करत आहोत ती बस किती वेळात आपल्या नियोजित स्थानकावर पोहचेल याबरोबरच पुढील काळात बेस्टबस तिकिटाची आगाऊ बुकिंग या ऍप द्वारे करता येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 4700 पैकी सध्या 3900 बसेस चालवल्या जात आहेत. जुन्या बसेस सेवेतून बाहेर केल्याने त्या जागी भाड्याने बसेस घेतल्या जाणार आहेत. बस भाड्याने घेतल्या म्हणून एकाही कर्मचार्यावर अन्याय होणार नाही. अनेक राज्यात आणि महानगरपालिकामधे अश्या भाड्यावर बसेस घेतल्या जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रम ही सेवा देणारी संस्था असल्याने फायद्याचा विचार न करता प्रवाश्यांना सुविधा देण्यासाठी बसेस चालवल्या जाणार आहेत. बस भाड़े कमी केल्याने आणि भाड्यात सुसुत्रीकरण केल्याने बेस्टला उत्पन्न कमी मिळत असले तरी प्रवाशी वाढले आहेत. एसी बस प्रमाणे आता साध्या बसच्या कमी अंतराचे भाड़े कमी करण्यास सांगितले आहे. प्रशासन त्यावर अभ्यास करत असून लवकरच कमी अंतराचे भाड़े कमी करून बेस्टचे प्रवाशी वाढवण्यावर भर देणार असल्याचे मिठबावकर यांनी सांगितले.
बेस्टदिना निमित्त 7 ऑगस्ट रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षणमंत्री व पालकमंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी कर्मचार्याचे स्नेह संमेलन व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. 6 व 7 ऑगस्ट रोजी बेस्टमधील ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन, तंबाखूमुक्त जनजागृती तसेच श्री.ना. पेंडसे यांच्या बेस्ट उपक्रमाची कथा या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
ओपन डेक बस ऱ्यालीत कलाकार5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कुलाबा आगार मरीन ड्राइव्ह ऑपेरा हाउस अशी 'साथिया साथ निभाना' ऱ्याली काढली जाणार आहे. या ऱ्यालीमधे स्टार प्लस वाहिनेवरील मालिकतील विशाल सिंग, प्रताप हाडा, पारस बब्बर, तानिया शर्मा हे कलाकार सहभागी होणार आहेत.
विरोधकांनी बहिष्कार टाकू नएभ्रष्टाचाराबाबत कारवाई केली जात नाही असे कारण देत येत्या बेस्ट दिनावर कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बेस्ट समिती सदस्यानी बहिष्कार टाकला आहे. औषध खरेदी प्रकरणात समिती नेमली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर कारवाई सुरु आहे. अध्यक्ष या नात्याने मी स्वता याचा पाठपुरावा करत आहे. यामुले कारवाई सुरु असताना असा बहिष्कार टाकने योग्य नसल्याने कोंग्रेस राष्ट्रवादीने बहिष्कार टाकू नए असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष मीठबावकर यांनी केले.
No comments:
Post a Comment