मुंबई / प्रतिनिधी 20 Aug 2016
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'एच पूर्व' विभाग क्षेत्रातील मा. न्यायालय (वांद्रे कोर्ट) परिसराजवळील अनंत काणेकर मार्गावरील १५ अतिक्रमणे / अनधिकृत बांधकामे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान हटविण्यात आली आहेत. त्याचबरोबर वांद्रे शासकीय वसाहत परिसरात असणा-या नागरी आरोग्य केंद्राजवळील ६ अतिक्रमणे / अनधिकृत बांधकामे यावर देखील महापालिकेच्या एच पूर्व विभागाद्वारे धडक कारवाई करण्यात येऊन सदर अनधिकृत बाबी हटविण्यात आल्या आहेत.
परिमंडळ ३ चे उपायुक्त वसंत प्रे. प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्यातील वरिष्ठ निरीक्षक उमेश तांबडे व कनिष्ठ अभियंता (परिरक्षण) विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या १५ जणांच्या चमूने ही कारवाई केली आहे, अशी माहिती 'एच पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान १ जेसीबी, १ डंपर यासह २ अतिक्रमण निर्मूलन वाहनांचा देखील वापर करण्यात आला.
No comments:
Post a Comment