नवि दिल्ली दि 9 Aug 2016 - आदिवासी हे भारतातील मूळ रहिवासी आहेत त्यांच्या सर्वांगीण सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एन डी ए चे सरकार कटिबद्ध आहे. दलितांबरोबरच आदिवासींनाही सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरातील आणि जगभरातील आदिवासींना केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शुभेच्छा दिल्या आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील दलितांसोबतच आदिवासींनाही संविधानाद्वारे आरक्षणाचा अधिकार दिला आहे. आदिवासीं जमातींमध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. देशातील आदिवासींची सामाजिक आर्थिक स्थिती बिकट असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातून आदिवासींचा उद्धार होण्यासाठी विकासासाठी डॉ आंबेडकरांनी दिलेला लोकशाहीचा मार्ग स्वीकारून आदिवासी तरुणांनी आपल्या जमातींना मुख्यप्रवाहात आणण्याचे आवाहन आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment