मुंबई दि 3: रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा पूल वाहून गेला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागामार्फत या घटनेची सखोल चौकशी करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेला आता काही तास उलटले आहेत. दरम्यान या दुर्घटनेत बेपत्ता झालेले प्रवासी आणि वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आज सकाळी विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या दुर्घटनेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी केली होती. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ब्रिटीशकालीन पुलांचे सर्वेक्षण आयआयटीमार्फत केले जाईल असे सांगितले. जे धोकादायक पूल असतील त्यांच्यावरील वाहतूक बंद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment