मुंबई / प्रतिनिधी 11 Aug 2016 - मुंबईवासी असलेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांच्या सोयीसाठी दादर पूर्व येथे जनशिकायत कक्ष केंद्र सुरु केले पण गेल्या 20 महिन्यात सुरेश प्रभू फक्त एकदाच या केंद्रात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे दादर पूर्व येथील जनशिकायत कक्ष केंद्राची विविध माहिती मागितली होती. मध्य रेल्वेचे जन माहिती अधिकारी आणि उप महाव्यवस्थापक साकेत कुमार मिश्रा ने अनिल गलगली यांस कळविले की 9 जानेवारी 2015 रोजी दुपारी 4 वाजता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या जनशिकायत कक्ष केंद्रात आले होते. उप मुख्य अभियंता( बांधकाम) यांच्या एका भागात जनशिकायत कक्ष केंद्र सुरु केले असून पूर्वीचे कार्यालय पाठील भागात ते सुरु आहे. या कार्यालयात आतापर्यंत 1600 तक्रारी प्राप्त झाल्या असून दररोज अंदाजे 12 ते 25 नागरिक या कार्यालयात येतात. जनशिकायत कक्ष केंद्रात गाडयाची ये-जा, निरीक्षण, विशिष्ट ठिकाणी थांबणे, प्रवाश्यांची सुविधा आणि अन्य तक्रारी प्राप्त होतात.
खर्चाची माहिती बाबत 2 परस्पर विधाने असून उप मुख्य अभियंता (बांधकाम) राजीव मिश्रा यांनी कोणताही खर्च न झाल्याचा दावा केला आहे तर जनशिकायत कक्ष केंद्राचे उपसचिव प्र.म.कुळकर्णी यांनी क्षुल्लक काम झाल्याचा दावा केला आहे. अनिल गलगली यांच्या मते जनशिकायत कक्ष केंद्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्राधान्य देत सुरु केले असले तरी ते नियमितपणे तेथे बसत नाही.त्यामुळे मुंबईकर ज्या आशेने जनशिकायत कक्ष केंद्रात जातात त्या तुलनेत तक्रारीचे निदान होत नाहीत. सुरेश प्रभू यांनी कमीत कमी मुंबईत असताना येथे बसून मुंबईकरांचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे आवाहन अनिल गलगली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment