महाड पूलदुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

महाड पूलदुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई, दि. ३ :- मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेल्यानं झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, तसेच या दुर्घटनेतील मनुष्यहानीला शासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्यानं या पुलाच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली.
  
विधान परिषदेत नियम २८९ द्वारे या दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करताना इतका कमकुवत पूल वाहतूकीस खुला कसा ठेवण्यात आला, तसेच त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले होतो का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत संबंधित पुलाबाबत चुकीचे निर्णय घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. सदर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यां मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली, तसंच मृतांच्या कुटुंबियांबद्दल सांत्वना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad