महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्यास मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2016

महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्यास मान्यता

मुंबई 10 Aug 2016 - महाराष्ट्रातील महानगर प्रदेशांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास करण्यासाठी या प्रदेशांच्या विकासाचे एकात्मिक नियोजन व समन्वयन करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 


महाराष्ट्रातील महानगर प्रदेशात येणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच परिसरातील गावांचा जलद, सुनियोजित व शिस्तबद्ध विकास करण्याबरोबरच विविध प्रकल्प राबविताना सुसुत्रता राहण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.  हे प्राधिकरण स्थापन करुन त्यास संविधानिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाचा मसुदा प्रख्यापित करण्यास यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्याबाबतचे विधेयक पावसाळी अधिवेशनात संमत झाले नाही. परिणामी त्याचे अधिनियमात रुपांतर होऊ शकलेले नाही. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

हे प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश वगळता उर्वरित राज्यातील विविध महानगर प्रदेश क्षेत्राचे नियोजन व समन्वय करेल. या प्राधिकरणात मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, संबंधित पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, या क्षेत्रातील महापौर, जिल्हा परिषद, रोटेशन पद्धतीने नगराध्यक्ष, चार विधानसभा सदस्य, विधानपरिषदेचा एक सदस्य आदींसह विविध अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad