मुंबई, दि. 9 : येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यावतीने दिनांक 13 व 14 ऑगस्ट 2016 रोजी इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांकरिता छत्री रंगविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात दिसणाऱ्या इंद्रधनूच्या रंगांची छटा विद्यार्थ्यांना स्वत:च्या कुंचल्यातून छत्रीवर प्रत्यक्ष साकारता यावी आणि पावसाचा मनमुराद आनंद स्वत:रंगविलेल्या छत्रीसोबत लुटता यावे, याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे संचालक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिनांक 13 ऑगस्ट 2016 रोजी इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत आणि दिनांक 14 ऑगस्ट 2016 रोजी इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा नेताजी सुभाष पथ, चर्नी रोड, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथे होणार आहे. कार्यशाळेकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एका शाळेतील जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यी सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेत छत्री रंगविण्याकरिता रंग बालभवन याच्यावतीने देण्यात येतील.
No comments:
Post a Comment