आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रेस जतन करणे शक्य - न्यायालयात अहवाल सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2016

आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रेस जतन करणे शक्य - न्यायालयात अहवाल सादर

पुढील सुनावणी येत्या १८ ऑगस्ट रोजी
मुंंबई / प्रतिनिधी
दादर येथील आंबेडकर भवन धोकादायक ठरवून पाडण्यात आले असले तरी हे भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची इमारत मजबूत असल्याचा अहवाल कोर्टाने नेमलेल्या शशी प्रभू यांनी कोर्टाला सादर केला आहे. यामुळे बचावात्मक पावित्रा घेत आंबेडकर भवनमधील ऐतिहासिक बुद्धभूषण प्रिटींग प्रेसची इमारत पाडण्याचा आमचा हेतू नव्हता, भवनाची धोकादायक झालेली मूळ इमारत पाडताना प्रिटींग प्रेस इमारतीची चुकून काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्या प्रेस जेथे आहे, त्या स्ट्रकचरची डागडुजी करण्यास ट्रस्टींची काहीच हरकत नाही, असे पीपल इम्प्रुमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयास सांगण्यात आले. 

उच्च न्यायालयाच्या २० क्रमांकाच्या न्यायालयात सोमवारी आंबेडकर भवन प्रकरणाची सुनावणी पार पडली. वास्तुविशारद शशी प्रभू समितीने प्रेस इमारतीच्या दुरुस्तीबाबत न्यायालयास दिलेल्या अहवालाच्या प्रती आज दोन्ही बाजुकडील पक्षकाराच्या वकीलांना देण्यात आल्या. त्यावर १८ आॅगस्ट रोजी दोन्ही बाजूकडील म्हणणे मांडले जाईल. पीपल इम्प्रुमेंट ट्रस्टींनी जूनमध्ये आंबेडकर भवन पाडले होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भवनची इमारत श्रमदानाने बांधण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यामुळे ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयात इंजक्शन याचिका दाखल केली होती. तसेच आंबेडकर भवन इमारतीच्या पुनर्विकासात बाह्य शक्तींचा होत असलेला हस्तक्षेप रोखण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली होती.

बुद्धभूषण प्रेसचे आणि आंबेडकर भवनाचे बांधकाम मजबूत
विश्‍वस्तांनी उद्ध्वस्त केलेले बुद्धभूषण प्रेसचे आणि आंबेडकर भवनाचे बांधकाम अद्यापही मजबूत असून या वास्तूचे जतन करणे सहज शक्य आहे असा निष्कर्ष प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू यांनी काढला. त्यासंदर्भातला अहवाल प्रभू यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. शशी प्रभू यांच्या या निष्कर्षामुळे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन या दोन्ही वास्तू धोकादायक स्थितीत होत्या हा द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. 

ट्रस्टी म्हणणाऱ्यांना चपराक 
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आंबेडकर भवनवर कब्जा करतील म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोर्ट रिसिव्हर नेमावा अशी मागणी ट्रस्टी म्हणवणाऱ्या काही मंडळीनी केली होती. न्यायालयाने कोर्ट रिसिव्हर नेमण्यासही नकार दिला होता. आता आंबेडकर भवन आणि बुद्ध भूषण प्रेसचे बांधकाम मजबूत असून त्याचे जातं करता येऊ शकते असा अहवालच न्यायालयात सादर झाल्याने आंबेडकर भवन पडणाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad