‘एल’ विभागातील काही परिसरांत ४ ऑगस्ट रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2016

‘एल’ विभागातील काही परिसरांत ४ ऑगस्ट रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एल विभाग येथे १२०० मि.मी. (नवीन तानसा) x                ९०० मि.मी. व ८०० मि.मी. (विहार) x ७५० मि.मी. च्या जोडणीचे काम कॉसमॉस सोसायटी, शिवसृष्टी मार्ग येथे प्रस्तावित आहे.

सदर काम गुरुवार, दिनांक ०४ ऑगस्ट, २०१६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत एल विभाग येथील प्रभाग क्रमांक १६०, १६२, १६३ व १६४ मधील नेहरुनगर, क्रांतिनगर, शिवसृष्टी, चुनाभट्टी, व्हि. एन. पुरव मार्ग, कामगार नगर, मदर डेअरी मार्ग, एव्हरार्ड नगर, कसाईवाडा, कुरेशीनगर, उमरवाडी, साबळेनगर, कुर्ला टर्मिनस, नवीन टिळकनगर व एम/पश्चिममधील प्रभाग क्रमांक १४२ मधील भक्ती पार्क आणि एफ/दक्षिण विभागातील प्रतीक्षा नगर या विभागास पाणीपुरवठा होणार नाही.

तरी सदर नमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे. तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक ०४ ऑगस्ट, २०१६ सकाळी १० वाजेपासून  ४८ तासांकरीता पाणी गाळून व उकळून वापरावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad